संख्याचे प्रकार

                                                       

संख्याचे प्रकार



1)  नैसर्गिक संख्या ( मोजसंख्या ) counting numbers :-
                                                                     1,2,3,4,5,6,…..या क्रमाने येणार्‍या आणि मोजण्यासाठी वापरल्या जाणार्‍या संख्याना नैसर्गिक संख्या म्हणतात. यालाच counting numbers म्हणतात. यालाच क्रमवार संख्याही म्हणतात. यामध्ये 0 ही संख्या येत नाही म्हणून 0 ही नैसर्गिक संख्या नाही..

2)  पूर्ण संख्या (whole numbers) :-
                                          0,1,2,3,4,5,6,…….या संख्याना पुर्ण संख्या म्हणतात.

3)  सम संख्या (even numbers) :-
                                         ज्या संख्याला 2 ने भागले असता बाकी शुन्य राहतात म्हणजेच भाग पुर्ण जातो आणि एकक स्थानी 0,2,4,6,8 हे
अंक असतात त्यांना सम संख्या म्हणतात. 0 ही सुद्धा सम संख्या आहे.

4)  क्रमवार सम संख्या :-
                           क्रमाने येणार्‍या सम संख्याना क्रमवार समसंख्या म्हणतात. उदा :- 2,4,6,8,10,12, इत्यादी.

5)  विषम संख्या (odd numbers) :-
                                          ज्या संख्येला 2 भागले असता बाकी 1 उरतात आणि संख्येच्या एककस्थानी 1,3,5,7,9 हे अंक असतात.त्या संख्येला विषम संख्या म्हणतात.


6)  क्रमवार विषम संख्या :-
                           क्रमाने येणार्‍या विषम संख्याना क्रमवार विषम संख्या म्हणतात. उदा :- 1,3,5,7,9,11 इत्यादी... क्रमवार सम किंवा विषम संख्येमध्ये नेहमी 2 चा फरक असतो.

7)  मुळ संख्या (prime numbers) :- 
                                          ज्या संख्येला 1 आणि तीच संख्या याशिवाय अन्य कोणत्याही संख्येने भाग जात नाही. त्या संख्येला मुळ संख्या म्हणतात. उदा :- 13 या संख्येला 13 आणि 1 नीच भाग जातो दुसर्‍या कोणत्याही संख्येने भाग जात नाही म्हणुन 13 ही मुळ संख्या झाली.

                1 ते 100 पर्यंत एकुण 25 मुळ संख्या आहे.

1ते 10
2,3,5,7
51 ते 60
53,59
11 ते 20
11,13,17,19
61 ते 70
61,67
21 ते 30
23,29
71 ते 80
71,73,79
31 ते 40
31, 37
81 ते 90
83,89
41 ते 50
41,43,47
91 ते 100
97
संख्याचे प्रकार

8)   संयुक्त संख्या :-
                   ह्या संख्येला 1 आणि तिच संख्या याशिवाय दुसर्‍याही संख्येनी भाग जातो त्याला संयुक्त संख्या म्हणतात .उदा :- 6 या संख्येला 1, 6, 2, 3 इत्यादि संख्येनी भाग जातो म्हणुन ही संयुक्त संख्या आहे.
1 ही मुळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही.

9)   जोड मुळ संख्या :‌-  
                         ज्या मुळ संख्या मध्ये 2 चा फरक असतो आणि त्या जोडुन आलेल्या असतात. त्याला जोड मुळ संख्या म्हणतात. 1 ते 100 पर्यंत आठ जोड मुळ संख्यांच्या जोड्या आहेत.3 व 5, 5 व 7, 11 व 13, 17 व 19, 29 व 31, 41 व 43, 59 व 61, 71 व 73 इत्यादी.
10) सहमुळ संख्या :‌ - 
                             ज्या दोन संख्या मध्ये 1 खेरीज कोणताही सामाईक अवयव नसतो. त्याना सहमूळ संख्या म्हणतात. यालाच परस्पर मुळ संख्याही म्हणतात. उदा :-  12 व 35 , 12 चे अवयव = , व 35 चे अवयव =  यामध्ये सामाईक म्हणजेच सारखा अवयव 1 आहे. म्हणुन ह्या सहमूळ संख्या आहेत.
    
 

    https://youtu.be/YSOQ-MacSR4 हा धडा समजुन घेण्यासाठी ही लिक 

<script async src="//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"></script>
<!-- second -->
<ins class="adsbygoogle"
     style="display:inline-block;width:336px;height:280px"
     data-ad-client="ca-pub-4686461295786503"
     data-ad-slot="5441519906"></ins>
<script>
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
</script>





टिप्पणियाँ